जे दिसते ते असेच का!

जे दिसते ते असेच का? हे उलगडण्याला शिका!
प्रत्येक गोष्ट का घडते? प्रत्येक गोष्टी मागचे कारणं समजून घ्यायचा प्रयत्न तो लहानपणापासून करत असे. त्याचा हा खूप चांगला गुण होता. या प्रश्नांच्या उत्तरातून तो बहुतेक इतिहास घडवणार होता. त्यांची प्रश्न जर त्याने स्वतः, इतरांनी टाळली असती तर! त्याच्या मनातील शंका तशाच राहिल्या असत्या. दररोजच्या जीवनामधले, अभ्यासामधले हे सगळे प्रश्न म्हणजे त्यांना पडलेले कोडे असत. त्याच्यासाठी ही कोडी सोडवण्याचा, प्रश्नाचे उत्तर दिल्याचा, मिळाल्याचा आनंद खूप वेगळा होता. हीच सवय त्यांच्या आयुष्यात कायम राहिली आणि एक दिवस !
एका छोट्या प्रश्नाच्या कुतूहलापोटी, प्रयत्न करून शोध घेतलेल्या उत्तरासाठी थोर शास्त्रज्ञ सी. वी. रमण यांना जगातील सर्वोत्कृष्ट नोबेल पारितोषिक मिळाले. सी. वी. रमण एका समुद्र प्रवासात  जहाजाच्या डेकवरून फेरफटका मारत होते. सभोवार नजर जाईल तिकडे निळाशार अथांग समुद्र आणि कठड्याला दोन्ही हात टेकवून सहज नजर वर गेली तर! विस्तृत! नजरेच्या कवेत न मावणारे आकाश दिसले….
असे स्वतःला विसरायला लावणारे काही क्षण ते शरीर, मनाने अनुभवत असल्यामुळे त्यांना जहाजाचा एकसुरी आवाजही अडथळा निर्माण करत नसेल.
निरीक्षक दृष्टी, चौकसबुद्धी जागृत होती.
असे का?
नेमके काय घडत असेल?
समुद्र आणि आकाशाकडे पहात असताना त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की, पाणी आणि हवा दोन्ही वेगवेगळी माध्यमं आहेत तरीदेखील आकाशाचा आणि पाण्याचा रंग निळा का दिसतो? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यातून त्यांना जगमान्य वैज्ञानिकांचे सर्वोच्च नोबेल पारितोषिक मिळाले. आणि त्यांच्या त्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या नावाने ‘raman effect’ म्हणून जगमान्य आणि प्रसिद्ध झाले.
घटनांच्या मागचे वैज्ञानिक उत्तर शोधणारे ते सिद्ध व्यक्ती झाले म्हणून प्रसिद्ध झाले. आणि वैज्ञानिक उत्तरे शोधली म्हणून थोर शास्त्रज्ञही…
शोध लावणे, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक होणे असे ठरवून होतात का? एखाद्या गोष्टीचा खूप अभ्यास करून, ध्यास घेऊन पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असताना अचानक  शोध लागत असतात.
वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे केवळ विज्ञान भाषेत दिलेली उत्तरे नाहीत. तर दररोजच्या दैनंदिन जीवन, कामे, वस्तू, घटना याबद्दल मनात आणि डोक्यात निर्माण झालेले प्रश्न…. या सगळ्या मागचे कारणे शोधणे…. नेमके असेच का घडते हे शोधणे…

कोणत्याही क्षेत्रातील, विषयातील अश्या नवनवीन संकल्पना, तत्त्वज्ञान, उत्तरे, कारणे शोधणार्या व्यक्ती सिद्धच असतात.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चार्वाक ऋषि, गौतम बुद्ध यांच्यापासून ही अशी कार्यकारणभाव ओळखण्याची पद्धत सुरू आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *