गवताचं पातं..
बरे झाले जरा खाली जमिनीवर बसले मी…
नजरेत प्रसन्न सगळी गवताची पाती होती …
चार बाजूंनी डोंगर अन् लागून खाई…
तरी निश्चींत, एकांत अन् अभेद्य शांताई…
इथे घुमतात फक्त आता आवाज मनीचे…
तुम्ही ऐकली ती केवळ कर्मसाद होती…
इथे क्षणात विरतात सारेच बुडबुडे…
जे तिथे वरवर भ्रमात तरंगत होती…
बरे वाटले आताशा जरा खाली बसले मी…
चढण्यास आयुष्या कोणती पायरी उरली नाही…
हळूहळू चढेल अन् वेढेल पाणी…
शेवटी विरघळेल इथे हर एक कहाणी….
जीवन नितळ, निर्मळ जरी प्रवाही …
खोलवर साचेल हर जखम विराणी…
पाषाणगर्भात धरणीच्या असतील का लोण्यापरी गाणी!…
त्यातून उगवतील, उमटवतील वाटांवर निशाणी…
दिले होते तिथे मी कर्तव्यसार उरलेलेही…
केली ती फक्त माझी काही चाकरी नव्हती!..
शिंपल्यात जपले अश्रू, न ओघळता कधी..
साठवून आठव बनतील तेच अनमोल मोती…
गतीने चालले अवघड वाटा…कधी अगतिक झाले मी?
अनेक वाटा शोधताना, दिसताना …
बरे झाले आता जरा थांबले मी..
बरे झाले जरा थांबले मी…
- गवताचं पातं - January 26, 2025
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
2 thoughts on “गवताचं पातं”
ही कविता आयुष्याच्या वाटचालीतील थांबा, आत्मचिंतन आणि अनुभवांची गोळाबेरीज यावर आधारित आहे.
कवितेचा सोपा अर्थ असा आहे:
1. वास्तवतेची जाणीव:
आजूबाजूला हिरवेगार गवत, उंच डोंगर, आणि खोल खाई असूनही ती निश्चिंत आहे.
मनात अनेक आवाज घुमत असले तरी ती आतून शांत आहे.
2. आयुष्याची चढउतार:
जीवनात अनेक टप्पे पार केले, आता वर चढण्यासाठी काही शिल्लक नाही.
शेवटी जीवनाच्या आठवणी आणि जखमा खोलवर साचतात, त्या विसरल्या जात नाहीत.
3. कर्तव्यनिष्ठा आणि समर्पण:
आपले कर्तव्य मनापासून पार पाडले, केवळ जबाबदारी म्हणून नव्हे, तर त्यात समर्पण होते.
भावनांना शिंपल्यात जपले, त्यातूनच आठवणींचे अनमोल मोती निर्माण होतील.
4. आत्मशोध आणि विराम:
वाटा कठीण होत्या, कधी अगतिक वाटले, तरी वाटा शोधत राहिले.
अखेरीस थांबून, विचार करून पुन्हा नव्याने जीवनाची जाणीव झाली.
निष्कर्ष:
ही कविता आयुष्याच्या अनुभवांवर चिंतन करून नवीन सुरुवात करण्यासाठी प्रेरित करते. जीवनातील चढउतार, अनुभव, आठवणी आणि शांततेचे महत्त्व सांगणारी ही एक आत्मपरिक्षणात्मक कविता आहे.
अभिप्रायचाच एक सुंदर लेख तयार झाला आहे 👌🏼