आजीच्या आठवणी…

 

 

आजीच्या आठवणी

१)आषाढी एकादशी देवा विठ्ठलानं केली
रूकमिनं वागाट्याला गेली
तिनं सवळ्याची वटी केली

( वागाटे नावाची एक  रानावनातील फळभाजी जी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात खातात.)

२) रूसली बाई रुकमिना

विठ्ठला शेजारी बसना !
तिला गरदी सोसंना…
भोळ्याभाळ्या भक्तांची तिला गरदी  सोसंना!
रूसली बाई रुकमिनी
जाऊनी बसली पाणंदी
चला मनती आळंदी
देवा माझ्या विठ्ठला चला आळंदी

 

३) चिरबंदी कमानीला हात दोन!
रूकमिनं मनती विठ्ठलाला जनाबाई तुजी कोण?
ऐक रूकमिनं सांगतो एक !
मी तिचा पिता ती माजी लेक!

चांदीचं कवाडं वाजतं कारकुरं
जागी झाली रूकमिनं नारं
रुकमिनं जेऊ वाढी विठ्ठलाला
निरशा दुधामदी केळ
परि देवाला आवडलं जनाबाईचं ताक शिळं

 

४) तुळसेबाई हिंडू नको ग रानीवनी
वाडा माझा चिरबंदी जागा देते वृदांवनी

५)तुळशीचा बाई पाला
वारीयानं गेला
वावदनांचा  कुणी गोळा केला
आवडीनं गोळा केला
देवा माझ्या विठ्ठलानं गोळा केला

६) सकाळी उठूनी तोंड पहावं गाईचं अन् दारी झाड तुळसाबाईच

७) हात मी जोडीते घराच्या दारातून  पाव गिरीतून देवा माझ्या लक्ष्मी रमण
देवामदी देव बाई बालाजी सोन्याचा
दिवा साजूक लोण्याचा
देवामदी देव बाई देव बालाजी नादर
झोका खेळतो आदर सोन्याच्या साखळीचा

तेलंग देशामदी साळीच पिकं फार

खिचडीचं जेवणार देव माझा बालाजी

कानगी करायला नको नाही माझं मन
रातव्यान येत धनं देवा माझ्या बालाजीचं…

क्रमशः

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

6 thoughts on “आजीच्या आठवणी…”